लाइसोसोमला आत्मघातकी पिशव्या का म्हणतात?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 15:01

 लयकारिका (Lysosomes):

लयकारिका साध्या एका आवरणाने बनलेली पिशवी असते त्यांना कोश असेही म्हटले जाते.
लयकारिका या गॉल्जीपिंड मार्फत तयार केल्या जातात. यांच्यामध्ये विविध पाचक विकरे (Digestive Enzymes) असतात.
वनस्पती पेशीत लयकारिका कमी प्रमाणात असतात.
पेशींमध्ये घडत असलेल्या विविध चयापचय क्रियानंतर जटील टाकाऊ कार्बनी पदार्थ तयार होतात. त्या पदार्थांचे पचन लयकारिका करत असतात म्हणून त्यांना पेशीतील टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था असे म्हणतात.
पेशींवर हल्ला करणाऱ्या जिवाणू आणि विषाणूंसारख्या रोगजंतूंना लयकारिका नष्ट करतात म्हणून तिला पचन पिशव्या (Digestive Bags) असेही म्हणतात.
पेशींमध्ये बिघाड झाल्यास तेव्हा त्या पेशीतील लयकारिका फुटतात व त्यातील विकरे पेशींचे पचन करतात; म्हणून लायकारिकांना आत्मघाती पिशव्या (Suicidal -Bags) म्हणतात.
सजीवांना अन्न न मिळाल्यास लयकारिका पेशीत साठविलेल्या प्रथिने आणि मेद यांचा उपयोग करून शरीरात आवश्यक ऊर्जा पुरविण्याचे कार्य करतात.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info